Showing posts with label साईट. Show all posts
Showing posts with label साईट. Show all posts

Monday, 7 November 2011

फेसबुक आणि ट्विटर जीमेलशी जोडा

ला माहीत आहे, फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडता आले, तर तुम्हाला फारच आनंद होणार आहे. सारखं सारखं अनेक टॅब्ज ओपन करुन वेगवेगळ्या अकाऊंट्सला लॉग इन होत बसणं... ही खरंचऽ एक मोठी डोकेदुखी आहे.

नवा मेल आला आहे का!? ते पाहण्यासाठी आपण जीमेल मध्ये अधूनमधून डोकावून पहात असतोच, तसंच मग... सहज म्हणून जाता जाता... फेसबुक आणि ट्विटर वरही एक नजर टाकाता आली, तर ते आणखीनच छान होईल!

१. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेल अकाऊंट ला लॉग इन व्हा.
२. त्यानंतर settings वर क्लिक करा.
३. settings मध्ये Lab या पर्यायावर जा.
४. Add any gadget by its URL "enable" करा. आणि मग "save changes" वर क्लिक करा.
५. आता परत settings वर क्लिक करा. यावेळी settings मध्ये तुम्हाला gadgets हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक करा.
६. Add a gadget by its URL च्या खाली, दिलेल्या रिकाम्या जागेत, आत्ता देत असलेली लिंक कॉपी आणि पेस्ट करुन टाका.
७. फेसबुकसाठी त्या रिकाम्या जागेत पुढे देत असलेली लिंक टाका आणि Add वर क्लिक करा  http://hosting.gmodules.com/ig/gadgets/file/104971404861070329537/facebook.xml
८. ट्विटरसाठी त्या रिकाम्या जागेत पुढे देत असलेली लिंक टाका आणि Add वर क्लिक करा  http://twittergadget.appspot.com/gadget-gmail.xml
 ९. आता inbox वर क्लिक करा आणि आपल्या डाव्या साईडबारमध्ये खालच्या बाजूला (चॅटच्या खाली) पहा! फेसबुक आणि ट्विटर, तुमच्या जीमेलला जोडले गेल्याचे तुम्हाला दिसून येईल. गुगलने गुगल बझ जीमेलला जोडलं! अगदी तसंच फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडले जातील.
१०. फेसबुकचे स्टेटस पाहण्यासाठी ‘फेसबुक वेजेट’च्या expand या पर्यायावर क्लिक करा. ट्विटरचे स्टेटस पाहण्यासाठी ‘click here' लिहिले आहे, त्यातील here या लिंक वर क्लिक करा.
११. युजरनेम, पासवर्ड टाकून परवानगी (Allow) दिल्यानंतर तुमचे अकाऊंट्स जीमेलमध्ये काम करु लागतील.

अशाप्रकारे गुगल बझ नंतर फेसबुक आणि ट्विटरचे अकाऊंट्स देखील तुम्हाला तुमच्या जीमेल खात्याशी जोडता येतील. हे दोन अकाऊंट्स जीमेलशी जोडले गेल्याने आपली अतिशय उत्तम अशी सोय होणार आहे.

वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

Saturday, 5 November 2011

स्वत:ची सोशलनेटवर्किग साईट फुकटात कशी बनवाल? (भाग२)

मंडळी मागच्या भागात आपण याची माहिती करून घेतली,ज्याना ते पाहता आले नसेल ते त्याची माहिती स्वत:ची सोशलनेटवर्किग साईट फुकटात कशी बनवाल?(भाग१)
या दुव्यावर टिचकी देवून पाहू शकतात.
या नंतर तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) कसे मिळवाल? हा लेख वाचून तुम्ही तुमच्या साईट साठी फ्री डोमेन नेम मिळवू शकता.
आताच्या भागात आपण तुमच्या सोशलनेटवर्किग साईटच्या सेटिंग कश्या बदलायच्या याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

१)प्रथम तुमच्या सोशल नेटवर्किंग साईटवर युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग-इन व्हा.

२)जे पान उघडेल त्यावर खालील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे "Customize this page " नावाचा पर्यांय दिसेल,त्यावर टिचकी द्या.

३)असे केल्यावर प्रत्येक पानावर बदल करण्यासाठी खालील कोपर्‍यामध्ये खालील दोन चिन्ह दिसतील
 त्यातील खालील चिन्हावर टिचकी द्या.

४)असे केल्यावर settings दर्शवणारे पान उघडेल त्यातील Title मध्ये तुम्हाला हवे ते बदल करा,यानंतर save करायला विसरू नका.

५)हवे ते बदल करून झाल्यावर Finish customizing वर टिचकी द्या.

६)या नंतर Admin पर्यांयावर टिचकी द्या.

७)आता जे पान उघडेल त्यावर तळाला वेगवेगळे पर्यांय दिसतील.

८)Plugins पर्यांयातील १)Installed plugins २)Available plugins पर्यांयाचा वापर करून तुम्ही विविध Plugins तुमच्या साईट मध्ये समाविष्ट करू शकता.

९)Settings पर्यांयातील
      १)Basic चा वापर करून तुम्ही तुमच्या साईटची माहिती बदलू शकता.
      २)User settings चा वापर करून तुम्ही सदस्य विषयीची माहिती बदलू शकता.
      ३)SMTP पर्यांयाचा वापर फक्त जाणकारानी करावा इतरानी त्यात काहीही बदल करण्याची गरज नाही.

१०)Privacy & Permissions चा वापर करून तुम्ही तुमचे नेटवर्क खाजगी करावे की सार्वजनिक या बाबतचा निर्णय़ घेवू शकता.योग्य ते बदल करून ते save करायला विसरू नका.

११)Appearance मधील Available themes पर्यांयाचा वापर करून तुम्ही हवे ते theme निवडू शकता.

१२)योग्य ते theme निवडून झाल्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे activate वर टिचकी द्या. असे केल्याने ते theme तुमच्या साईट वर लागू होईल.


१३)theme मधील logo बदलण्यासाठी Appearance>>>Theme settings पर्यांयामध्ये जा.मग विविध पर्यांया पैकी चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Logo image पर्यांयाची निवड करून Browse.. वर टिचकी देवून योग्य आकाराचा Logo अपलोड करा,मग settings सेव्ह करा.


१४)Pages & Menus मध्ये View all pages/menus वर टिचकी द्या,त्या पानावरील १)Menu २)Bottom Menu मध्ये नावे बदलण्यासाठी अथवा दुवे काढून टाकण्यासाठी त्या नावा वर माऊस घेवून जा आणि edit पर्यांयावर टिचकी द्या.मग हवे ते बदल करून सेव्ह करा.

१५)Visible For पर्यांया समोरील Guests आणि Registered Members हे दोन्ही पर्यांय निवडलेत तर ते तुमच्या साईटला भेट देणार्‍या कोणालाही दिसेल. जर तुम्हाला ते फक्त Registered Members साठी खुले ठेवायचे असेल तर Join Now हा पर्यांय फक्त Guests साठी खुला ठेवून,बाकी पानांसाठी Registered Members हा पर्यांय निवडा,म्हणजे पाहुण्यांना फक्त सहभागी होण्याचे पान दिसेल बाकी काही नाही.


१६)Add Item पर्यांयाचा वापर करून तुम्ही Menu मध्ये आणखी दुवे जोडू शकता.

१६)जर ते तुम्हाला मराठी मध्ये बदलायचे असतील तर माझ्या ब्लॉग वरील या मराठी टायपिंग दुव्याचा वापर करा.

माझी सोशल नेटवर्किंग साईट पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.मराठी सोशल
समुदाय,फोरम इत्यादी कसे बनवायचे ते आपण पुढच्या भागात पाहू.अश्याच अनेक गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.

वरील लेख http://prashantredkarsobat.blogspot.com/ या साईट वरून घेण्यात आला आहे.


Read more: http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/06/blog-post_28.html#ixzz1cpRXKyKf

स्वत:ची सोशलनेटवर्किग साईट फुकटात कशी बनवाल? (भाग १ )

सध्या सोशलनेटवर्किगने सगळीकडे धुम उठवली आहे..जो तो फेसबुक,ऑर्कुट वर असतो.पण ते झाले त्यांचे स्वत:चे प्रायव्हेट नेटवर्क,त्यावर तुमचे नियंत्रण काहीच नाही..आणि जर स्वत:ची सोशल नेटवर्किंग साईट बनवायची असेल तर तुम्हाला डोमेन नेम,वेब होस्टिंग यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो..पण जर आज मी तुम्हाला असे काही तरी दाखवले की ज्याच्या वापर करून तुम्ही स्वत:ची साईट बनवू शकता ती सुद्धा अगदी फुकट..तर काय म्हणाल?
शक्य नाही?झोपेत आहेस का?तुला वेड लागले आहे? :-D
मंडळी तुम्हाला जे वाटते आहे असे काहीही झालेले नाही.कधी कधी वेड्यासारखा करत असलो तरी मी पुर्ण शहाणा आहे. ;-)
चला तर मग..आता जास्त थट्टा मस्करी न करता,मुळ मुद्याकडे वळू या.



त्या आधी तुम्ही मी बनवलेल्या सोशल सोशलनेटवर्किग साईटला भेट देवून हे खरच शक्य आहे का? त्याची खात्री करून घेवू शकता.
http://marathisocial.tk/

स्वत:ची सोशलनेटवर्किग साईट फुकटात कशी बनवाल?

१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
social-network

२)आता जे पान उघडेल त्यावर
Site Name आणि Site Address मध्ये तुम्हाला हवी असलेली माहिती भरा...मी भरलेली नाही आणि मग गो वर टिचकी द्या.

३)आता जे पान उघडेल त्यावर
*Social Network name
*Address
*Tagline
*About इत्यादी आवश्यक ती माहिती भरा.
आवश्यक बाबींची पुर्तता करून झाल्यावर CREATE वर टिचकी द्या.

४)आता जे पान उघडेल त्यावरील Choose Theme हा पर्यांय वापरून हव्या त्या Theme ची निवड करा.मग CREATE वर टिचकी द्या.

५)आता हे खाते तुमच्या नावावर नोंदवण्यासाठी तुम्हाला register your profile या पर्यांया मध्य खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे माहिती भरावी लागेल.ती भरून झाल्यावर Sign Up वर टिचकी द्या.

६)आता जे पान उघडेल त्यावर
Sign Up successfull
You need to verify your email
असे संदेश असतील.

७)त्यामुळे तुम्हाला तुमचे इ-खाते उघडून आलेल्या मेल मधील पडताळणी दुव्यावर टिचकी देवून खात्याची शहानीश्या करून घ्यावी लागेल.

८)हे कार्य पार पडले की तुमची साईट सुरु झाली.

९)आता त्या साईटसाठी तुम्हाला मोफत डोमेन हवे असेल तर ते कसे मिळवायचे,ते तुम्ही या लेखात वाचू शकता.

१०)साईटच्या सेटिंग कश्या बदलायच्या,ग्रुप,चर्चापीठ कसे बनवायचे ते पुढच्या भागात पाहू.
पुढच्या भागाच्या नोंदी मिळवण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका. :-)
 दुसर्‍या भागाचा दुवा खाली देत आहे :-)
स्वत:ची सोशलनेटवर्किग साईट फुकटात कशी बनवाल?(भाग२)
वरील लेख http://prashantredkarsobat.blogspot.com  या साईट वरून घेण्यात आला आहे.