Showing posts with label ब्लॉग. Show all posts
Showing posts with label ब्लॉग. Show all posts

Monday, 7 November 2011

आपल्या ब्लॉगवर कोण लिहू शकेल? आपला ब्लॉग कोण वाचू शकेल?

आपण आपल्या ब्लॉगवर आपल्या व्यतिरीक्त आणखी काही लोकांना लिहिण्यासाठी आमंत्रित करु शकतो. अशावेळी आपण अनुमती दिल्यानंतर आपला ब्लॉग त्यांना त्यांच्या ‘ब्लॉगर डॅशबोर्डवर’ दिसू लागेल. पण त्यांना आपल्या ब्लॉगचा केवळ लिहिण्यापुरताच भाग दिसणार असून, ब्लॉगच्या इतर सेटिंग्ज मात्र आपल्याच नियंत्रणात असणार आहेत. त्यामुळे कसालीही काळजी न करता आपण इतरांस आपल्या ब्लॉगवर लिहिण्यासाठी आमंत्रण देऊ शकतो. मी स्वतः अशाप्रकारे माझ्या दोन मित्रांच्या ब्लॉगचा सह-लेखक आहे. आणि त्यांवर मी ब्लॉगही लिहले आहेत. त्यामुळे या गोष्टी मी स्वतः पडताळून पाहिल्या आहेत. याशिवाय, आज आपण पाहणार आहोत, आपला ब्लॉग कोण वाचणार? ते कसं ठरवता येईल? म्हणजे आपला ब्लॉग फक्त आपणच वाचू शकणार?, की आपण अनुमती दिलेले लोक? की हे सबंध जग? हे आपण स्वतः ठरवू शकतो. ते कसं आणि कुठून ठरवता येईल? त्यासंबंधीची माहिती मी आता आपल्याला देत आहे.

आपल्या ब्लॉगवर कोण लिहू शकेल?
१. blogger.com अ‍ॅड्रेस बार मध्ये टाईप करुन आपल्या ब्लॉगर डॅशबोर्ड पर्यंत पोहचा.
२. इथे डाव्या बाजूच्या साईडबारमधून Settings वर क्लिक करा. Settings मध्ये आपण Basic Settings पाहणार आहोत.
ब्लॉग लेखकाला अनुमती द्या, ब्लॉग कोण वाचू शकेल? ते ठरवा
३. Blog Authors मध्ये आपल्याला आपले नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेस Admin मागे दिसत असेल. त्याखाली Add Authors नावाचा पर्याय आहे. याचा वापर करुन आपण आपल्या ब्लॉगवर इतरांना लेखनासाठी आमंत्रित करु शकतो. + Add authors वर क्लिक केल्यानंतर उघडल्या जाणार्‍या खिडकीत आपण लेखनासाठी आमंत्रित करु ईच्छित असलेल्या लोकांचा ईमेल पत्ता देऊन ok वर क्लिक केल्यास, त्यांना आपल्या ब्लॉगवर लेखन करण्यासाठीचं आमंत्रण पाठवलं जाईल.

आपण ज्यांना लेखनासाठी आमंत्रण पाठवलं आहे, त्यांना आपला ब्लॉग त्यांच्या ‘ब्लॉगर डॅशबोर्डवर’ कसा दिसेल? त्यांना आपल्या ब्लॉग संदर्भात काय काय करता येईल?
आपला ब्लॉग अनुमती दिलेल्या सहलेखकाच्या ‘ब्लॉगर डॅशबोर्ड’ वर असा दिसेल
चित्रात दाखवल्यप्रमाणे आपण ज्यांना ब्लॉगवर लिहिण्यासाठी आमंत्रित केलं आहे, त्यांना त्यांच्या ब्लॉगर डॅशबोर्डवर आपल्या ब्लॉगसंदर्भात केवळ तीन पर्याय दिसतील.
१. नवी पोस्ट लिहिने.
२. आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या ब्लॉग पोस्ट ‘पाहणे’. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्या लेखकाने एखादी ब्लॉग पोस्ट लिहिली आहे, तोच त्या ब्लॉग पोस्टला एडिट करु शकणार असून, इतर सह-लेखक केवळ ती पोस्ट पाहू शकणार आहेत.
३. Settings : Author Options मध्ये खालील गोष्टी अनुमतीत लेखक करु शकतो.
अनुमतीत लेखक ब्लॉग पोस्ट SMS, MMS, Email ने पोस्ट करण्याबात ठरवू शकतो. शिवाय मिळालेली अनुमती काढून घेऊ शकतो.
अ) ब्लॉग पोस्ट मोबाईल SMS, MMS द्वारे प्रकाशित करण्याबाबतचे बदल.
ब) ब्लॉग पोस्ट ईमेलने प्रकाशित करण्याबाबतचे बदल.
क) स्वतःला आपल्या ब्लॉगचा लेखक म्हणून काढून टाकणे. याप्रमाणे आपणही आपल्या ब्लॉगवरील अनुमतीत लेखकाला कधीही काढून टाकू शकतो. त्यासाठी आपल्याला Settings - Basic - Blog Authors हा वर सांगितलेला प्रवास करावा लागेल. इथून आपण अनुमती दिलेल्या लेखकास हटवू शकतो.

वर नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरीक्त अनुमती दिलेल्या लेखकाला आपल्या ब्लॉग संदर्भात काही करता येणार नाही. तर हे होतं आपल्या ब्लॉगवर इतर लेखकांना आमंत्रित करण्याबाबत. आता आपण आपला ब्लॉग कोण पाहू शकेल? हे ठरवणार आहोत.

आपला ब्लॉग कोण वाचू शकेल?
आपला ब्लॉग कोण वाचू शकेल? ते ठरवा.
आपला ब्लॉग कोण वाचणार? ते आपण ठरवू शकतो. हे अगदी सोपं आहे. एखाद्याला केवळ आपल्या कुटूंबियांसाठी, मित्रासांठी ब्लॉग लिहायचा असेल आणि त्याला असं वाटत असेल की, आपला ब्लॉग हा केवळ त्यांनीच वाचावा, तर तो तसं करु शकतो. किंवा त्याला आपला ब्लॉग स्वतःपुरताच ठेवायचा असेल, तर तो ते देखिल करु शकतो. याबाबतची निवड आपल्याला Blogger Dashboard - Settings - Basic - Blog Readers मध्ये दिसून येईल.
१. Anybody या पर्यायाची जर आपण निवड केली असेल, तर आपल्या ब्लॉगचा पत्ता माहित असणारी जगातील कोणतीही व्यक्ती आपला ब्लॉग वाचू शकणार आहे.
२. Only these readers मध्ये आपण ज्यांचे ईमेल अ‍ॅड्रेस देऊन ठेवले आहेत, तेच केवळ लॉग इन झाल्यानंतर आपला ब्लॉग वाचू शकणार आहेत.
३. Only blog authors मध्ये आपल्या ब्लॉगचे लेखकच केवळ आपला ब्लॉग वाचू शकणार आहेत. यात जर आपण इकटेच लेखक असाल, तर केवळ आपणच आपला ब्लॉग वाचू शकणार आहात. जर आपण इतर लेखकांना ब्लॉग लिहिण्यासाठी आमंत्रित केलं असेल, तर मात्र आपल्यासहीत ते देखिल आपला ब्लॉग वाचू शकणार आहेत. लेखकांव्यतिरीक्त इतर लोक, जे हा ब्लॉग वाचण्याचा प्रयत्न करतील त्यांना हा ब्लॉग खाजगी असल्याचा संदेश दिसेल.

तर अशाप्रकारे आपला ब्लॉग कोण वाचणार आहे? ते आपण ठरवू शकाल. ब्लॉगिंगबाबत अधिक माहिती हवी आहे? इथे आपल्याला हवी ती सर्व मदत मिळेल.

वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?

ज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. मी देखिल माझ्या मित्रांना माझ्या ब्लॉग बद्दल सांगतो, तेंव्हा ते मला सर्वात आधी हाच मूळ प्रश्न विचारतात की, ब्लॉग कसा तयार करायचा? संगणक समोर नसताना मी त्यांना इतकंच सांगतो, की blogger.com वर जा, तिथे काही साध्या-सोप्या मोजक्याच पायर्‍या सांगितल्या आहेत, त्या वाचून त्याप्रमाणे करत गेलात, की लगेच तुमचाही एक ब्लॉग तयार होईल. पण यापुढे जर मी ऑनलाईन असताना मला कोणी विचारलं की, ब्लॉग कसा तयार करायचा? तर मी त्यांना माझ्या या लेखाचा दुवा देईन, जेणेकरुन त्यांना त्यांचा स्वतःचा ब्लॉग अगदी सहजगत्या तयार करता येईल. आणि आपले विचार, कल्पना, ज्ञान जगासोबत वाटून आपण काही करत आहोत याचे समाधान त्यांना मिळेल.


ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?
१. सर्वप्रथम गुगलच्या blogger.com या साईटवर आपल्याला त्यासाठी जावं लागेल.
२. चित्रात दाखवल्याप्रमाणे Get Started वर क्लिक करा.
ब्लॉग तयार करण्यासाठी इथून सुरुवात करा
३. आपण जीमेल, ऑर्कुट इ. कोणतीही गुगलची सेवा वापरत आहात का? म्हणजेच आपलं गुगल खातं, गुगल अकाऊंट आहे का? नसेल, तर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पान आपल्याला दिसेल, त्यात आवश्यक ती माहिती भरुन सर्वप्रथम आपलं एक गुगल खातं तयार करा. मोठ्या आकारात पाहण्यासाठी खालिल चित्रावर क्लिक करा.

गुगल अकाऊंट तयार करा
ब्लॉग तयार करण्यासाठीच्या तीन साध्या-सोप्या पायर्‍यांपैकी ‘गुगल अकाऊंट’ तयार करण्याची पहिली पायरी आपण पूर्ण केली आहे.
४. आता ब्लॉग तयार करण्यासाठीची दुसरी पायरी आपण पूर्ण करणार आहोत.
लोक आपल्या ब्लॉगला ओळखणार कसे? आणि ते आपल्या ब्लॉग पर्यंत पोहचणार कसे? लोकांनी आपल्या ब्लॉगला ओळखावं आणि त्यांनी आपल्या ब्लॉगपर्यंत पोहचावं यासाठी आपण आपल्या ब्लॉगला एक नाव देणार आहोत, शिवाय त्या ब्लॉगला एक पत्ता देणार आहोत. जसं आपल्या घराला एक नाव असतं, नंबर असतो आणि घरापर्यंत पोहचायचा एक पत्ता असतो. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे दिलेल्या जागा भरुन CONTINUE वर क्लिक करा.
ब्लॉगला नाव आणि पत्ता द्या
५. आपला ब्लॉग कसा दिसावा असं आपल्याला वाटतं? ते आपण तिसर्‍या पायरीमध्ये ठरवणार आहोत. यात आपल्यासमोर काही टेम्प्लेट्स सादर केले जातील. टेम्प्लेट म्हणजे एकंदरीत आपला ब्लॉग कसा दिसेल!? याबाबतचं स्वरुप, रचना. घराचंच उदाहरण घेतलं, तर आपलं घर कसं दिसावं?, ते कसं असावं? याबाबत आपल्या काही कल्पना असतात की नाही! प्रत्येकाचं घर सारखं असत नाही. त्याचप्रमाणे प्रत्याकाचा ब्लॉग हा ब्लॉगच असला, तरी तो प्रत्येकाच्या टेम्प्लेट निवडीनुसार वेगवेगळा दिसू शकतो.

एकदा निवडलेलं टेम्प्लेट आपण पुढे कधीही, केंव्हाही आणि कितीही वेळा बदलू शकतो. म्हणजेच आज आपल्याला वाटलं की, आपला ब्लॉग असा दिसावा, उद्या वाटलं तसा दिसावा, तर आपण कधीही आपल्या ब्लॉगचे टेम्प्लेट बदलून त्याची रचना, स्वरुप बदलू शकतो. त्यामुळे अगदी निःश्चिंतपणे समोरील कोणत्याही एका टेम्प्लेटची निवड करुन CONTINUE वर क्लिक करा.
ब्लॉगचे टेम्प्लेट निवडा
६. अशाप्रकारे आपला स्वतःचा एक ब्लॉग तयार झाला आहे. आता Get Started वर क्लिक करुन लेख, कविता, साहित्य लिहायला सुरुवात करा. म्हणजेच ब्लॉग लिहायला, ब्लॉगिंगला सुरुवात करा.
आपला ब्लॉग तयार झाला आहे. ब्लॉग लिहायला सुरुवात करा
वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

Read more: ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा? | इंटरनेट, 2know.in http://www.2know.in/2011/06/blog-post.html#ixzz1d0PYkiyW
Under Creative Commons License: Attribution Non-Commercial No Derivatives

Saturday, 5 November 2011

ब्लॉग म्हणजे काय?

या लेखात आपण ब्लॉग म्हणजे काय? ते अगदी थोडक्यात पाहणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय?
‘ब्लॉग’ हे एक असं माध्यम आहे, जिथे आपण स्वतःस व्यक्त करतो किंवा व्यक्त होतो. ‘मराठी ब्लॉग विश्व’ या इथे आपण जर एक नजर टाकलीत, तर ब्लॉग म्हणजे काय? हे आपणांस समजण्यास सोपं जाईल. या इथे अनेक मराठी लोकांचे ब्लॉग आपणांस एकत्रित दिसून येतील. ब्लॉगला मराठीमध्ये अनुदिनी, जालपत्रिका किंवा जालनिशी असं म्हटलं जातं (संदर्भ - मराठी विकिपीडिया). ब्लॉगची आणखी एक प्रमुख ओळख म्हणजे यावर तारखांच्या अनुषंगाने लेख लिहिलेले असतात. आपण नेहमी जी ‘डायरी’ वापरतो, त्यात जशा तारखा असतात, आणि त्यांनुसार त्या डायरीत आपण जसं लिहितो, आपले विचार व्यक्त करतो, अगदी तसंच ब्लॉगच्या संदर्भातही म्हणता येईल. यात फरक इतकाच की, डायरी मध्ये माहिती ही कागदाच्या, पानांच्या स्वरुपात साठवली जाते, तर ब्लॉग संदर्भात ही माहिती आभासी स्वरुपात साठवली जाते.


ब्लॉग तयार करण्यासाठीची माध्यमं

डायरी आणि वही यांमध्ये ढोबळमानाने जसा फरक करता येईल, काहीसा तसाच फरक आपणास ब्लॉग आणि वेबसाईट संदर्भात करता येईल. यांमध्ये एक हलकीसी अस्पष्ट सिमारेषा असून, डायरीच्या तारखा खोडून ती वहीसम वापरता येते. किंवा वहीवर तारखा घालून ती डायरीसारखी वापरता येते. पण आपण त्यांच्या स्वरुपामध्ये केलेला हा वरकरणी बदल असून शेवटी डायरी ती डायरी आणि वही ती वही! अगदी असंच ब्लॉग आणि वेबसाईट संदर्भातही म्हणता येईल.

ब्लॉगचे आणखी एक वेगळेपण असे की, आपली डायरी एकावेळी एकच जण वाचू शकतो, पण इंटरनेटच्या सहाय्याने आपला ब्लॉग हा एकाच वेळी कितीही जण वाचू शकतात, शिवाय त्यास स्थळाचेही बंधन नाही. म्हणजेच आपला ब्लॉग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका इ. अशा सर्व ठिकाणचे लोक एकाचवेळी वाचू शकतात. लेखाच्या प्रकाशनानंतर त्यास काळाचेही बंधन उरत नसून २४ तासात कधीही, कोणीही, कुठूनही इंटरनेट-संगणकाच्या सहाय्याने आपला ब्लॉग आणि त्यावरील लेख वाचू शकतो. अर्थात हे सर्व नियंत्रित करण्याची सुविधा आपणास देण्यात येते. त्यामुळे कधीही, कोणीही, कुठूनही या शब्दांनी नवीन ब्लॉगर्सनी घाबरुन जाण्यचं काही एक कारण नाही.

आपल्या ब्लॉगवरील लेख वाचून झाल्यानंतर वाचकाच्या मनात त्यासंदर्भात काही विचार निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपले हे विचार तो ब्लॉग लेखकापर्यंत कॉमेंटच्या माध्यतून, प्रतिक्रियेच्या माध्यमातून पोहचवू शकतो. हे त्याला कसं करता येईल? तर त्यासाठी ब्लॉगवरील प्रत्येक लेखा खाली एक रिकामा चौकोन दिलेला असतो. आपले मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी तो रिकामा चौकोन वाचकांना देण्यात आला आहे. अशाप्रकारे, या माध्यमातून ब्लॉग लेखकाचे विचार आणि वाचकांचे विचार यांमध्ये एक सुसंवाद निर्माण होतो आणि त्यातून भविष्यकालीन सामाजिक वाटचालीचा मध्यममार्ग निघू लागतो. प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याची सुविधाही ब्लॉगकर्त्यास देण्यात आलेली असते. त्यामुळे त्यासंदर्भातही नवीन ब्लॉगर्सनी चिंता करु नये. आपल्या संमतीशिवाय कोणीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा आपला ब्लॉग वाचू शकत नाही. समाजाला वैचारिक दिशा देण्याचं काम लेखक करत असतात. आणि ‘ब्लॉग’ हे त्यासाठीचं आजच्या युगातलं एक दमदार माध्यम आहे.

आता ब्लॉग म्हणजे काय? हे अधिक चांगल्यारितीने स्पष्ट होण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात.

gnachiket.wordpress.com : हा ‘नचिकेत’ यांचा ‘वर्डप्रेस’ च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला ब्लॉग असून त्यांच्या ‘निदान फुकट तरी द्या’ या लेखात ते वर्तमानपत्रांतील जाहिरातींच्या अतिरेकावर प्रकाश टाकतात, तर ‘देव - रँडम थॉट्स’ या आपल्या लेखात ते ‘देव’ या महत्त्वाच्या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले मत मांडतात. या लेखाच्या खाली आपण इतर वाचकांनी त्यासंदर्भात दिलेल्या प्रतिक्रिया वाचू शकतो. अशाप्रकारे एखाद्या विषयावर सर्वांगिण चर्चा घडण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी, ब्लॉग हे चांगलं माध्यम आहे. याव्यतिरीक्त त्यांच्या ‘एम.आर.आय..’ या लेखात त्यांनी स्वतः जीवनात अनुभवलेला प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर खास रोचक शैलीत उभा केला आहे! अशाप्रकारे आपल्या वैयक्तिक जीवनातील अनुभवही आपण ब्लॉगच्या माध्यमातून इतरांसमोर मांडू शकतो.

तर वरील उदाहरणावरुन काय लक्षात आलं? सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, मानसिक इ. आपल्या जीवनातील सर्व घटकांना आपण ब्लॉगच्या सहाय्याने मनातून जगासमोर मुक्त करु शकतो. नचिकेत यांनी आता आपला हा ब्लॉग पुस्तकरुपात सर्वांसमोर आणला आहे. तर यादृष्टिनेही आपण ब्लॉग लिहिण्याचा विचार करा. आणि यासंदर्भात जालावर अनेक सोयीसुविधाही उपलब्ध आहेत.

ब्लॉग हे केवळ लेलितलेखनाचे माध्यम आहे असं नसून, विज्ञान-तंत्रज्ञान विषयक माहिती सांगणारे लेखही आपण ब्लॉगच्या माध्यमातून लिहू शकतो. तंत्रज्ञान विषयक इंग्रजी ब्लॉगिंग हा आजकाल एक महत्त्वाचा व्यवसाय ठरत असून, एका ठराविक काळात निरपेक्ष कष्ट केल्यास, त्यावर आपला अगदी उत्तम चरितार्थ चालू शकतो. अशाप्रकारे ब्लॉग हे एक उपजीविकेचे साधनही ठरत आहे.

ही होती ‘ब्लॉग म्हणजे काय?’ या संदर्भातली थोडक्यात माहिती. आशा आहे आपल्याला ‘ब्लॉग म्हणजे काय?’ हे आता काही प्रमाणात का होईना! समजलं असेल. ‘ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?’ हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

वरील लेख http://2know.in/ या साईट वरून घेण्यात आला आहे.

Read more:
ब्लॉग म्हणजे काय? | इंटरनेट, 2know.in http://www.2know.in/2011/01/blog-post_16.html#ixzz1cq8u1j3W
Under Creative Commons License:
Attribution Non-Commercial No Derivatives

तुमच्या ब्लॉगवर लेखकाचे नाव आणि सही कशी समाविष्ट कराल?

मंडळी आज आपण "ब्लॉगवर लेखकाचे नाव आणि सही कशी समाविष्ट करायची याची माहिती करून घेणार आहोत.

१)यासाठी प्रथम Photoshop अथवा online "Signature Generators" वापरून तुमची स्वत:ची सही तयार करा.

ऑनलाईन Signature Generator वापरण्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा.



२)एकदा का तुमची सही असलेले चित्र तयार झाले की ते तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये अपलोड करा आणि त्या नंतर preview वर टिचकी देवून त्या चित्राचा दुवा (image URL) कॉपी करून घ्या आणि ती ब्लॉग पोस्ट पब्लिश न करता draft म्हणून सेव्ह करायला विसरू नका.

३)आता ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template  मध्ये जा आणि Expand Widget Templates समोर टिचकी द्या.

४)आता खाली दिलेल्या कोड लाईनचा तिथे शोध घ्या.

<div class='post-footer-line post-footer-line-1'>

जर ती कोड लाईन तुमच्या ब्लॉग सापडली नाही तर

<p class='post-footer-line post-footer-line-1'>

अथवा

<data:post.body/>
या कोड लाईनचा शोध घ्या.

५) या नंतर खाली दिलेले कोड वरील पैकी योग्य त्या कोड लाईनच्या खाली पेस्ट करा.
<img src='url of yoursignature image'  style='border:0px;'/>
url of yoursignature image च्या जागी तुम्ही मघाशी जो तुमच्या सहीच्या चित्राचा दुवा (image URL) कॉपी केला होता तो पेस्ट करा.

६)आता तुमचे Template सेव्ह करायला विसरू नका.

असे केल्याने तुमच्या प्रत्येक ब्लॉग पोस्टच्या तळाला तुमच्या नावाची सही दिसू लागेल.
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/05/blog-post_1232.html#ixzz1cqGl6zYS
वरील लेख http://prashantredkarsobat.blogspot.com/ या साईट वरून घेण्यात आला आहे.

Read more: