Monday, 7 November 2011

चेहर्‍याचे हावभाव आभ्यासा

र आज आपण चेहर्‍यांच्या हावभावांचा एक खेळ खेळणार आहोत. आपल्या चेहर्‍यावर काय काय असतं ज्यातून आपल्या भावना व्यक्त होतात!? डोळे, भुवया, तोंड, ओठ आणि याशिवाय एकंदरीतपणे खाली वर केलेला चेहरा. माणसाचा मेंदू खरं तर भावना व्यक्त करणार्‍या चेहर्‍यावरच्या अशा बारीक खाणा खुणा लगेच ओळखू शकतो. आणि रोज टि.व्ही. वर कार्यक्रम बघत असताना आपण माणसाच्या हावभावांचा जणू आभ्यासच करत असतो. खरं तर डायरेक्टर आणि कलाकारांनी काय करायचा तो आभ्यास केलेला असतो, पण तो नकळतपणे आपल्या अंतरंगात पोहचत राहतो.
चेहर्‍याचे हावभाव
आज आपल्याला एक अशी वेबसाईट पहायची आहे, जिचा वापर करुन आपण माणसाचे हावभाव रेखाटू शकतो, त्यांचा आभ्यास करु शकतो. Do2Learn च्या Facial Expressions या विभागाला आपण भेट देणार आहोत. त्यासाठी इथे क्लिक करा. यानंतर तुम्ही भेट द्याल त्या पानावर डाव्या बाजूला एक चेहरा असेल. तो दिसण्यासाठी तुमच्या संगणकावर ‘जावा’ असणं आवश्यक आहे. आपल्या संगणकावर जावा घेण्यासाठी या इथे क्लिक करा अथवा जावा घेण्यासाठीचे बटण त्या पानाच्या वर दिलेले आहेच!

तर आता Facial Expressions च्या पानावर डाव्या बाजूला तुम्हाला एक चेहरा दिसत आहे, असं म्हणायला हरकत नाही! वरच्या बाजूला afraid, interested, sad, ashamed, disgusted, surprized, happy, angry अशा प्रकारच्या भावना दिलेल्या आहेत आणि प्रत्येकासमोर एक रिकामा बॉक्स दिलेला आहे. बाजूला दिलेल्या चेहर्‍यावर समजा तुम्हाला interested ही भावना हवी आहे, तर interested च्या समोर असलेल्या रिकाम्या बॉक्सवर माऊसच्या सहाय्याने टिकमार्क करा. त्यानंतर चेहर्‍याच्या वरच्या बाजूला Reset हा पर्याय दिलेला आहे. त्याचा वापर करुन तुम्ही चेहरा पूर्ववत करु शकता.

आता चेहर्‍याच्या शेजारी उजव्या बाजूला काही पर्याय दिलेले आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही त्या चेहर्‍यावर हवी अशी भावना आणू शकता, देऊ शकता. त्यासाठी भुवया कशा असाव्यात?, डोळे, त्यांचा कटाक्ष कसा असावा?, तोंडाचा आकार, ओठांची रचना, चेहर्‍याची वर-खाली होणारी हालचाल, अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःहून बदल करुन पाहू शकता. आणि तुम्ही काहीही बदल केलात तरी तो चेहरा मानवी संवेदनांच्या बाहेरचे उत्तर कधीच देणार नाही! त्या चेहर्‍यातून काही ना काही भावना ही व्यक्त होईलच. चला मग! एकदा ट्राय करुन पहा... तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, ज्यांना चित्रकलेची आवड आहे, तर त्यांना तुम्ही ही वेबसाईट दाखवू शकता. असं न्‌ तसं सुट्या सुरु झाल्याच आहेत. त्यांचीही थोडीशी करमणूक होईल, त्यातून काहीतरी शिकतील आणि विशेष म्हणजे दुपारच्या ऊन्हात गुणाने घरी बसतील.
 
वरील लेख लेखक रोहन जगताप यांच्या www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

Read more: चेहर्‍याचे हावभाव आभ्यासा | इंटरनेट, 2know.in http://www.2know.in/2010/05/blog-post_05.html#ixzz1d38NeaRI
Under Creative Commons License: Attribution Non-Commercial No Derivatives

PDF फाईल चा शोध घ्या, ई पुस्तक शोधा

जालावरील असंख्य पानांमधून PDF (पी.डी.एफ.) फाईल्सचा शोध कसा घ्यायचा ते आपल्याला पाहायचं आहे. ई-पुस्तकं देखील PDF (पी.डी.एफ.) फॉरमॅटमध्येच असतात, त्यामुळे तुम्हाला जर एखादे ई पुस्तक शोधायचे असेल, तर त्यासाठी देखील या लेखाचा तुम्हाला फायदा होईल.

बहुतेक जण गुगलचं सर्च इंजिन वापरत असल्याने आपण प्रथम पाहणार आहोत ते गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून PDF (पी.डी.एफ.) फाईल्सचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी एक गुगलचा शॉर्टकट आहे, तो तुम्हाला वापरावा लागेल. कोणत्याही प्रकारची PDF फाईल शोधायची असेल, तर त्यासाठी गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये प्रथम त्या फाईलचे नाव टाईप करा आणि मग त्यापुढे filetype:pdf असं टाईप करा. आता सर्च वर क्लिक करा. गुगल जे रिझल्ट्स घेऊन येईल ते सर्व रिझल्ट्स PDF फॉरमॅटमधले असतील. मागे आपण गुगलचे इतर काही शॉर्टकट्स पाहले होते, ते पाहायचे असतील तर या इथे क्लिक करा.
पी.डी.एफ. फाईल शोधा
गुगल सर्च इंजन च्या माध्यमातून PDF फाईल कशी शोधायची!? ते आपण पाहिलं आहेच! आता आपण खास PDF सर्च इंजिनचा विचार करुयात. पी.डी.एफ. फाईल्सचा शोध घेण्यासाठी pdf-search-engine.com हे एक चांगलं सर्च इंजिन आहे. मुख्य म्हणजे तुम्हाला जर एखादे पुस्तक हवे असेल, तर त्या पुस्तकाचे नाव फक्त यांनी दिलेल्या शोध खोक्यात (सर्च बॉक्स) टाकायचे आणि मग पी.डी.एफ. स्वरुपातील ते पुस्तक तुमच्या समोर हजर होते. त्यांनी त्यांच्या शोध खोक्यावर Search For a Book असंच लिहिलेलं आहे! म्हणजे खरं तर हे एक पुस्तक शोधण्याचेच सर्च इंजन आहे, असं आपण म्हणू शकतो.

PDF फाईल्स, ई पुस्तकं शोधण्यासाठी आणखीही काही सर्च इंजिन्स आहेत. त्यापैकी एक आहे pdfgeni.com. तिथल्या सर्च बॉक्स मध्ये एखादा विषय टाका आणि त्या विषया संबंधीत पुस्तकं तुम्हाला मिळतील. तशाच प्रकारची आणखी एक वेबसाईट म्हणजे search-pdf-books.com. बाकी गुगल, याहू आणि बिंग सर्च इंजिन्सच्या माध्यमातून PDF फाईल्सचा एकत्रितपणे शोध घेणारे सर्च इंजिन आहे pdfsearchengine.in.

अशाप्रकारे तुम्ही PDF (पी.डी.एफ.) स्वरुपातील ई पुस्तकांचा शोध घेऊ शकता. या सर्च इंजिन्सच्या माध्यमातून मला माझी ई पुस्तकं मिळाली आणि मला वाटतं आता तुम्हालाही हवं ते ई पुस्तक या माध्यमातून मिळू शकेल.
 

तीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन

ज आपण तीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स पाहणार आहोत, जे आपणाला वेळोवेळी उपयोगी पडतील. या एक्सटेन्शन्सच्या सहाय्याने आपणाला इंटरनेटवरील आवडलेली माहिती अथवा कोणतेही पान आपल्या  मित्रांबरोबर वाटता येईल, हव्या त्या शब्दाचा अर्थ अगदी सहजतेनं जाणुन घेता येईल आणि आपण पहात असलेली स्क्रिन कॅपचर करता येईल. याचा उपयोग खास करुन त्यांना होईल, जे आपला ब्लॉग प्रकाशित करतात किंवा एखाद्याला इंटरनेट वापरत असताना आलेली समस्या सांगत असताना देखिल स्क्रिनशॉट्सचा, स्क्रिन कॅपचरचा उपयोग होऊ शकतो. आपण पहात असलेली स्क्रिन जर आपल्याला इतरांना दाखवायची असेल, जी स्क्रिन ते पाहू शकत नाहीत, अशावेळी देखिल स्क्रिन कॅपचरचा उपयोग होऊ शकतो. उदा. फेसबुक मध्ये (किंवा इतरत्र कोठेही) लॉग इन झाल्यानंतर आपल्याच दिसणार आहे असा मजकूर. क्रोम वेब ब्राऊजर संबंधीत एक्सटेन्शन्स वापरण्यासाठी आपण क्रोम वेब ब्राऊजरचा इंटरनेटसाठी वापर करत असणं आवश्यक आहे.

या तीन क्रोम एक्सटेन्शन्स मधील दोन एक्सटेन्शन्स स्वतः गुगलने उपलब्ध करुन दिले आहेत आणि एक AddThis (अ‍ॅड धिस) या कंटेंट शेअरींग मधील आघाडीच्या वेबसाईटने आपल्यासाठी आणले आहे, त्यामुळे त्यांच्या विश्वसनियतेबद्दलही शंका घेण्याचे काही कारण नाही. खाली देत असलेल्या एक्सटेन्शन संबंधीत चित्रे आपल्याला त्या त्या दुव्यांवर (links) दिसून येतील.

‘अ‍ॅड धिस’ क्रोम एक्सटेन्शन:

अ‍ॅड धिस या क्रोम एक्सटेन्शनचा वापर करुन आपण इंटरनेटवरील आपल्याला आवडलेले कोणतेही पान आपल्या मित्रांबरोबर वाटू शकतो. एकदा हे एक्सटेन्शन इन्स्टॉल केले, की मग अ‍ॅड धिसचं बटण आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊजर मधील अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल. आपल्याला जर इंटरनेटवरील एखादं पान आवडलं, तर आपण केवळ अ‍ॅड धिसचं हे बटण क्लिक करायचं. त्यातून एक यादी उघडली जाईल, ज्यात नामांकित सोशल नेटवर्कींग वेबसाईट्सचा, सोशल बुकमार्कींग साईट्सचा आणि इतर अशाच काही सुविधा देणार्‍या साईट्सचा समावेश असेल. आपण त्यांपैकी कोणावरही क्लिक केल्यास, इंटरनेटवरील आपल्यला आवडलेले पान (ज्या पानावर आपण त्यावेळी असाल) त्या साईटवर शेअर केले जाईल, वाटले जाईल, त्या पानाचा पत्ता सांगितला जाईल. जेणेकरुन त्या विशिष्ट साईटचे (उदा. फेसबुक, ट्विटर, गुगल) सदस्य असलेल्या आपल्या इतर मित्रांना त्याबाबत माहिती होईल आणि मग तेही ते पान पाहतील.

गुगल डिक्शनरी एक्सटेन्शन: 

इंटरनेटच्या जाळ्यात फिरत असताना आपल्याला जर एखादा शब्द आडला, तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा ‘गुगल सर्च’ मध्ये शोधण्याची गरज नाही. आता हे काम अगदी कमी वेळात, सहजगत्या होऊ शकतं. ही डिक्शनरी इंग्लिश टू इंग्लिश असून इंग्लिश टू मराठी साठीही एक्सटेन्सन्स आहेत, पण ते गुगल कडून अधिकृतरीत्या उपलब्ध नसल्याने आणि त्यांची विश्वसनीयता माहित नसल्याने मी इथे देत नाहीये. गुगल डिक्शनरी एक्सटेन्शन इंन्स्टॉल केल्यानंतर आपण इंटरनेटवरील आपल्याला अडलेला शब्द सिलेक्ट करुन गुगल डिक्शनरी एक्सटेन्शनच्या बटणावर क्लिक केल्यास, एक खिडकी उघडली जाऊन त्यात आपल्याला त्या शब्दाचा विस्तृत अर्थ दिसून येईल. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना आता कंटाळा करायची गरज नाही. या एक्सटेन्शनचा आपल्याला इंग्रजी सुधारण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल.

गुगल स्क्रिन कॅपचर एक्सटेन्शन:

गुगल स्क्रिन कॅपचरच्या सहाय्याने आपण आपल्या संगणक स्क्रिनचा जो भाग पहात आहात, किंवा त्या भागापैकी आवश्यक असा हवा तो काही भाग चित्र स्वरुपात आपल्या संगणकावर संग्रहीत करु शकाल आणि मग ते चित्र अपलोड करुन आपण ते आपल्या मित्रांना दाखवू शकाल अथवा आपला ब्लॉग असेल, तर आपण आपल्या वाचकांना ते चित्र आपल्या ब्लॉगवर दाखवू शकाल. हे एक असं एक्सटेन्शन आहे, जे प्रत्येकाजवळ असायलाच हवं. कारण स्क्रिनशॉट्सचा, स्क्रिन कॅपचरचा आपल्याला नेहमी उपयोग होऊ शकतो. ब्लॉग चालकांसाठी तरी हे आवश्यक आहेच!
गुगल स्क्रिन कॅपचर एक्सटेन्शनच्या सहाय्याने घेतलेले 2know.in चे छायाचित्र
गुगल क्रोम वेब ब्राऊजर वापरुन मी वर दिलेल्या दुव्यांवर गेल्यानंतर आपण Install वर क्लिक करा. काही क्षणांमध्येच ते एक्सटेन्शन आपल्या ब्राऊजरमध्ये इन्स्टॉल होईल. फायरफॉक्स अ‍ॅड ऑन प्रमाणे आपल्याला ब्राऊजर रिस्टार्ट करण्याची गरज नाही. इन्स्टॉल झाल्यानंतर लगेच आपल्याला ते एक्सटेन्शन अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल.

आपल्याला इंटरनेट संबंधित, ब्लॉगिंग बाबत खूप काही शिकायचं असेल, तर या दुव्यावर देण्यात आलेले संपूर्ण पान वाचा. इथे आपल्याला भरपूर पैसे कमवण्याची संधीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

‘फेव्हिकॉन’ म्हणजे काय? ब्लॉगर ब्लॉगला स्वतःचा ‘फेव्हिकॉन’ कसा देता येईल?

जच्या आपल्या लेखात आपण ‘फेव्हिकॉन’ म्हणजे काय? ते पाहणार आहोतच, शिवाय ते आपल्या ब्लॉगला कसे देता येईल? याची माहिती देखिल घेणार आहोत. पूर्वी HTML Editing द्वारे आपण आपल्या ब्लॉगला फेव्हिकॉन देऊ शकत होतो, पण आत ब्लॉगरने आपल्यासाठी ही गोष्ट अधिक सोपी करुन दिली आहे. ‘ब्लॉगर इन ड्राफ्ट’ या ब्लॉगरच्या प्रायोगिक साईटच्या माध्यमातून आपण आपल्या ब्लॉगला अगदी सहजगत्या हवा तो फेव्हिकॉन देऊ शकतो. ब्लॉगरने आपलं काम सोपं केलं असलं, तरी HTML Editing द्वारे फेव्हिकॉन कसा देता येईल? ते देखिल आज आपण पाहणार आहोत. फेव्हिकॉन देण्याआधी आपल्याला फेव्हिकॉन अनुरुप इमेज फाईल कशी आणि कोठून तयार करता येईल? याची देखिल माहिती घ्यावी लागणार आहे. तर एकंदरीत ब्लॉगर ब्लॉगसाठी ‘फेव्हिकॉन’ ची माहिती घ्यायला आपण सुरुवात करुयात.

‘फेव्हिकॉन’ म्हणजे काय?
“एखाद्या वेबसाईटचं, यु.आर.एल. (url) साठी, शॉर्टकटसाठी, किंवा बुकमार्कसाठी असलेलं ‘प्रातिनिधिक चिन्ह’ म्हणजे आपण त्यास ‘फेव्हिकॉन’ असं म्हणू शकतो.”

फेव्हिकॉन म्हणजे काय हे चित्राद्वारे अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट होईल.
फेव्हिकॉन म्हणजे काय?
वरील चित्रात आपल्याला जो W दिसत आहे, तो विकिपीडिआ या साईटचा फेव्हिकॉन आहे. म्हणजेच विकिपीडिआ या साईटचे ते url साठीचे, बुकमार्कसाठीचे प्रातिनिधिक चिन्ह आहे. तर फेव्हिकॉन म्हणजे काय? हे आता आपल्याला समजलं असेल.

आपल्या ब्लॉगसाठी फेव्हिकॉन कसा तयार करायचा?

फेव्हिकॉन तयार करण्यास मदत करतील अशा अनेक वेबसाईट आज जालावर (इंटरनेटवर) उपलब्ध आहेत. फेव्हिकॉन चे चिन्ह हे १६*१६, ३२*३२, ६४*६४ यांपैकी एका आकारातील .ico फॉरमॅट मधील चित्र असून ते आपल्याला इंटरनेटवरील काही ऑनलाईन टुल्स वापरुन अगदी सहजगत्या तयार करता येतं. गुगल मध्ये आपण जर create favicon online, generate favicon online असा शोध घेतला, तर त्यासंबंधीत अनेक साईट आपल्याला सापडतील. या साईटचा वापर करुन आपण आपल्याजवळ असलेल्या एखाद्या छायाचित्रापासून फेव्हिकॉन तयार करु शकतो अथवा तिथे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या फेव्हिकॉन संग्रहातून आपल्या आवडीचा फेव्हिकॉन संगणकावर डाऊनलोड करु घेऊ शकतो. याव्यतिरिक्त अनेक साईट आपल्याला फेव्हिकॉन रेखाटण्याची सोय उपलब्ध करुन देत आहेत. त्यांचा देखील आपण उपयोग करु शकतो.

अशाप्रकारे आपला फेव्हिकॉन आता तयार झाला असेल. तो आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या.

फेव्हिकॉन ब्लॉगर ब्लॉगला कसा देता येईल? (सोपी पद्धत)

१. ही सुविधा अजून ब्लॉगरच्या नेहमीच्या आवृत्तीसाठी उपलब्ध नसून यासाठी आपल्याला draft.blogger.com या ब्लॉगरच्या प्रायोगिक साईट वर जावं लागेल.
२. ज्या ब्लॉगला फेव्हिकॉन द्यायचा आहे, त्या ब्लॉगच्या Design या विभागात प्रवेश करा.
३. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे Design या विभागातील Page Elements या उपविभागात आपल्याला फेव्हिकॉन बदलण्याबाबतचा नवा पर्याय समाविष्ट झालेला दिसून येईल.
फेव्हिकॉन बदलण्याबाबतचा ब्लॉगर मधील पर्याय
४. फेव्हिकॉन बदलण्यासाठी Edit वर क्लिक करा. Browse चा उपयोग करुन आपल्या संगणकावर याआधी डाऊनलोड केलेले फेव्हिकॉनचे चिन्ह निवडून ते अपलोड करावे. अपलोड झाल्यानंतर फेव्हिकॉन सेव्ह करा. कदाचीत फेव्हिकॉन मध्ये झालेला बदल आपल्याला लगेच दिसणार नाही. पण त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. कालांतराने नवीन सेशनला आपल्याला तो दिसू लागेल.

HTML Editing द्वारे ब्लॉगर ब्लॉगला फेव्हिकॉन कसा देता येईल? (तुलनेने अवघड पद्धत)

१. ज्या ब्लॉगचा फेव्हिकॉन आपल्याला बदलायचा आहे, त्या ब्लॉगच्या Design विभागात शिरुन त्याच्या Edit HTML या उपविभागात प्रवेश करा. आणि Expand Widget Template वर टिक मार्क करा.
२. आता Cltr+F ने </head> टॅग शोधा. त्याखाली <body> टॅग असेल. या दोन टॅगच्या मध्ये खाली दिलेला कोड टाका. यात ज्या ठिकाणी Your URL असं लिहिलं आहे, त्या ठिकाणी तुमचे फेव्हिकॉनचे URL टाका. आता हे फेव्हिकॉनचे URL आपल्याला कोठून मिळेल? तर ते आपल्याला iconj.com या साईटच्या माध्यमातून अगदी सहजरित्या मिळू शकेल.

<link href='Your URL' rel='shortcut icon' type='image/x-icon'/>

अ‍ॅनिमिटेड फेव्हिकॉन :
 
फेव्हिकॉन देताना आपल्या समोर दोन पर्याय आहेत.
१. साधे फेव्हिकॉन
२. अ‍ॅनिमेटेड फेव्हिकॉन

साधा फेव्हिकॉन हा एका स्थिर चित्रापेक्षा निराळा नसून अ‍ॅनिमेटड फेव्हिकॉन हा एखाद्या चलचित्रासारखा असतो. ज्यात चित्राबरोबरच अक्षरांचाही समावेश होऊ शकतो. या दुव्यावर आपल्याला भरपूर अ‍ॅनिमेटेड फेव्हिकॉन मिळतील.

फेव्हिकॉन बाबत विस्तृत अशी माहिती आपण घेतली आहे. आपल्या ब्लॉगला अशाप्रकारे आपली स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख आता मिळाली असेल.


Read more: ‘फेव्हिकॉन’ म्हणजे काय? ब्लॉगर ब्लॉगला स्वतःचा ‘फेव्हिकॉन’ कसा देता येईल? | इंटरनेट, 2know.in http://www.2know.in/2011/06/blog-post_22.html#ixzz1d31M1zLJ
Under Creative Commons License: Attribution Non-Commercial No Derivatives

इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रात फेसबुकचे वर्चस्व

लिकडच्या काळात लोक ऐकमेकांपासून दूरावत चालले आहेत, असं अनेक जण म्हणत असले, तरी फेसबुकच्या जमान्यात वरील विधानाचा पुर्नविचार करण्याची गरज भासू शकते. आज मी माझ्या अगदी प्राथमिक शाळेतील मित्रांपासून जीवनात आलेल्या-गेलेल्या बहुतांश लोकांच्या रोज संपर्कात आहे. फेसबुक आणि एकंदरीत सोशल नेटवर्कस्‌ शिवाय मी याची कल्पना देखील करु शकत नाही.

इंटरनेट आणि खास करुन सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रात फेसबुकने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. फेसबुक लवकरच गुगलला मागे टाकणार अशी चर्चा आता इंटरनेट क्षेत्रात सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जेंव्हा भारतात फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकले, तेंव्हा फेसबुकचे अस्तित्त्व प्राकर्षाने जाणवू लागले. कमी वेळात लोड होणारी पाने, नाद लावणारे गेम्स, अत्यंत उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स आणि युजर फ्रेंडली इंटरफेस ही फेसबुकच्या यशामागील काही ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. फेसबुकच्या फिड्स सदस्यांना अधिकाधिक अ‍ॅक्टिव्ह राहण्यास प्रोत्साहीत करतात. त्यामुळे फेसबुकमध्ये चैतन्यशाली वातावरण निर्माण झाले आहे.

ऑर्कुट कॉम्युनिटी अपडेट्स, अ‍ॅप्लिकेशन, गेम अपडेट्स हे सर्व आपल्याला ऑर्कुटच्या मुख्य पानावर दिसत नाहीत. ऑर्कुटची पाने लवकर लोड होत नाहीत. त्यामुळे ऑर्कुटवर म्हणावी तशी हालचाल निर्माण होऊ शकत नाही. फेसबुकच्या आव्हानास तोंड देत असताना मध्यंतरी ऑर्कुटने आपल्या स्वरुपात अमूलाग्र बदल केला. पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही. आता केवळ ब्राझिल मध्ये ऑर्कुट पहिल्या क्रमांकाचे सोशल नेटवर्क उरले असून आपले हे स्थान अबाधीत राखण्यासाठी त्यांना आपल्या कार्यप्रणालीत मोठे बदल करावे लागणार आहेत.

दीड वर्षांपूर्वी hi5 ने भारतात आपले पंख फडकवण्याचा प्रयत्न केला. पण एका मार्यादीत काळादरम्यान ज्या वेगाने ही लाट आली, त्याच वेगात ती निघूनही गेली. त्यापूर्वी काही महिने ‘इंडियारॉक्स’ ने बरेच सदस्य जमवले होते. ‘भारत स्टुडंट्स’ हे फेसबुक, ऑर्कुट, आयबीबो नंतर भारतातील क्रमांक चारचे सोशल नेटवर्क आहे. ताज्या माहितीनुसार ‘आयबिबो’ ने ‘भारत स्टुडंट्स’ ला मागे टाकले आहे. ‘आयबिबो’ या सोशल नेटवर्कचा विशेष उल्लेख करावा लागेल. यावर माझ्या मते उत्तर भारतीय लोकांचा प्रभाव अधिक आहे. एकंदरीत मला हे सोशल नेटवर्क आवडते. पण माझा एकही मित्र ‘आयबिबो’ वर नाही! हे विशेष! ‘आय टाईम्स’, ‘माय कँटोस’, ‘बॅचमेट्स’, ‘लिंक्डइन’, इ. इतरही अनेक सोशल नेटवर्कस्‌ आज भारतात आपलं अस्तित्व जाणवून देत आहेत.

सध्या ‘फेसबुक’ ही गुगल नंतरची जगातील क्रमांक दोनची वेबसाईट आहे. ऑर्कुटचा जगात ९७ वा क्रमांक लागतो. Hi5 चा जागतिक क्रमांक १६२ असून ‘आयबिबो’ चा जागतिक क्रमांक ५२५ आहे. खाली मी विविध सोशल नेटवर्कस्‌चा जगातील निरनिराळ्या देशांवरील वर्चस्वाचा नकाशा देत आहे. यावरुन कालामानाने जगातील इतर सोशल नेटवर्कस्‌ना मागे टाकून फेसबुक कशी आघाडी घेत आहे! ते आपल्याला दिसून येईल. मागील सहा महिन्यात फेसबुकने हंगेरीतून Iwiw, पोलंडमधून Nasza-Klasa, मंगोलियातून hi5 आणि भारतातून ऑर्कुट यांना मागे टाकले आहे. फेसबुकची ही प्रगती थक्क करुन टाकणारी आहे!

सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रातील जागतिक प्रभुत्वाचा नकाशा

वरील लेख रोहन जगताप यांच्या www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

चित्राची डायरेक्ट लिंक, html कोड मिळवा, शेअर करा

धीतरी इंटरनेटवर वावरत असताना प्रोफाईल चित्र लावण्यासाठी किंवा इतरत्र चित्र चिटकवण्यासाठी तुम्हाला चित्राच्या url ची विचारणा केली गेली असेल. शक्यतो आपल्या संगणकावरुन चित्र इंटरनेटवर घेण्याची सुविधा उपलपब्ध असते, पण कधी कधी मात्र चित्राच्या url बाबत विचारणा केली जाते. याशिवाय तुम्ही जर ब्लॉगर असाल, वेबसाईटचे मालक असाल किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कचे सदस्य असाल, तर अशावेळी तुम्हाला html कोडच्या स्वरुपातील चित्राचा देखील उपयोग होऊ शकतो. इथे ब्लॉगरवरसुद्धा पोस्ट मध्ये चित्र घेण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे संगणकावरुन आणि दुसरं म्हणजे चित्राची लिंक देऊन आपण ब्लॉगर पोस्ट मध्ये चित्र घेऊ शकतो. आता चित्राची लिंक कशी मिळवायची!? यासाठी एक एकदम सोपी पद्धत आहे. imageshack या वेबसाईटच्या माध्यमातून आपण चित्राची लिंकही मिळवू शकतो शिवाय त्या चित्राचा html कोडही आपल्याला त्यासोबत मिळतो.

चित्राची डायरेक्ट लिंक, html कोड मिळवण्याची पद्धत :
चित्राची डायरेक्ट लिंक, html कोड मिळवा.
imageshack वेबसाईट
१. imageshack या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल.
२. चित्र अपलोड करण्यासाठी या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. पण भविष्यात आपल्याला अपलोड केलेली इमेज डिलीट करायची असेल किंवा आपल्या चित्रांचा व्यवस्थित संग्रह करायचा असेल, तर रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही.
३. आता थेट Browse या बटणावर क्लिक करा आणि आपल्या संगणकावरुन एका चित्राची निवड करा.
४. आपला ई मेल ऍड्रेस द्या अथवा देऊ नका, तो पर्याय ऑप्शनल आहे. Image Resize या पर्यायाद्वारे आपण अपलोड करत असलेल्या चित्राचा आकार ठरवू शकता.
५. आणि आता शेवटी Upload Now या निळ्या बटणावर क्लिक करा. काही क्षणात तुमच्या संगणकावरील चित्र, इंटरनेटवर ऑनलाईन दिसेल.
६. आपण अपलोड केलेले चित्र शेअर कसे कराल? चित्राच्या खाली पहा! त्या तिथे आपण अपलोड केलेले चित्र ‘सोशल नेटवर्क’ वर शेअर करण्याबाबतचे पर्याय दिलेले आहेत.
७. त्यानंतर Direct Link च्या पुढील चौकोनात आपल्याला त्या चित्राची डायरेक्ट लिंक मिळेल.
८. HTML कोडच्या पुढील चौकोनात आपल्याला त्या चित्राचा HTML कोड मिळेल.

अशाप्रकारे एखाद्या चित्राची लिंक, अथवा HTML कोड मिळवणं हे केवळ दोन मिनिटाचं काम आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची देखील काही गरज नाही. इंटरनेटवरील प्रवासात imageshack या वेबसाईटचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होईल, याची मला खात्री आहे.
 

गुगल बुकमार्कस्‌

इंटरनेटवर एखादे पान किंवा एखादी वेबसाईट आपल्याला आवडते. अशावेळी ते पान आपल्याला कायमस्वरुपी संग्रहीत करायचे असेल, तर आपण त्या पानावर जायचा पत्ता साठवून ठेवू शकतो. असा पत्ता आपण अनेक ठिकाणी साठवू शकतो, उदाहरणार्थ आपल्या वेब ब्राऊजरमध्ये तुम्ही बुकमार्कस्‌ सेव्ह करुन ठेवू शकता. ऑनलाईन बुकमार्कस्‌ सेव्ह करण्यासाठी देखील अनेक साईट्स आहेत. जसे की, स्टंबलअपॉन, डिग इ.

एखादे पान बुकमार्क करण्याचा फायदा म्हणजे, एक तर आपण आपल्या आवडत्या पानापर्यंत अगदी सहज पोहचू शकतो. आणि दुसरं असं की, आपण आपले आवडते पान आपल्या मित्रांबरोबर आणि जवळच्या लोकांबरोबर शेअर करु शकतो. आपण आपल्या ऑनलाईन अनुभुतीचा एक चांगला संग्रह करु शकतो, जो आपल्या आवडीच्या कामाच्या दृष्टिनेही महत्त्वाचा असेल.

आजकाल बहुतेक प्रत्येकाने जीमेल अकाऊंट म्हणजेच गुगल अकाऊंट काढलेले आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की, गुगलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडत्या पानाचे ऑनलाईन बुकमार्कींग कसे करता येईल!?
गुगल बुकमार्कस्‌
१. https://www.google.com/bookmarks हा गुगलच्या बुकमार्किंग विभागाचा पत्ता आहे. इथे आपण आपले आवडते पान साठवू शकतो.
२. बुकमार्किंगच्या पानावर Tools मध्ये Add Bookmark नावाचा पर्याय आहे. इथून आपण आपल्या आवडत्या पानाचा पत्ता देऊन तो साठवू शकतो. किंवा आपण ज्या पानावर आहात तिथे गुगल बुकमार्कींग ची सोय असेल, तर आपण डायरेक्ट त्या पर्यायावर क्लिक करुन ते पान साठवू शकतो. उदा. या लेखाच्या खाली शेअरींगचे Add This बटण दिलेले आहे, त्याचा उपयोग करुन आपण हे पान गुगल बुकमार्कस्‌ मध्ये साठवू शकतो.
३. आपण आत्तापर्यंत इतरत्र साठवलेले बुकमार्कस्‌ इंम्पोर्ट या पर्यायाचा वापर करुन गुगल बुकमार्कस्‌ मध्ये आणू शकतो, किंवा गुगल बुकमार्कस्‌ मध्ये समाविष्ट असलेले बुकमार्कस्‌ एक्सपोर्टच्या सहाय्याने दुसरीकडे हलवू शकतो.
४. गुगल बुकमार्कस्‌ मध्ये आपण lists च्या सहाय्याने आपल्या बुकमार्कस्‌ चे वर्गीकरण करु शकतो.

इंटरनेटवरील ऑनलाईन पानांचा एक चांगला संग्रह तयार करण्यासाठी आपण ‘गुगल बुकमार्कस्‌’ चा उपयोग करुन घेऊ शकतो.
 
वरील लेख रोहन जगताप यांच्या www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.