Monday, 7 November 2011

फेसबुक आणि ट्विटर जीमेलशी जोडा

ला माहीत आहे, फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडता आले, तर तुम्हाला फारच आनंद होणार आहे. सारखं सारखं अनेक टॅब्ज ओपन करुन वेगवेगळ्या अकाऊंट्सला लॉग इन होत बसणं... ही खरंचऽ एक मोठी डोकेदुखी आहे.

नवा मेल आला आहे का!? ते पाहण्यासाठी आपण जीमेल मध्ये अधूनमधून डोकावून पहात असतोच, तसंच मग... सहज म्हणून जाता जाता... फेसबुक आणि ट्विटर वरही एक नजर टाकाता आली, तर ते आणखीनच छान होईल!

१. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेल अकाऊंट ला लॉग इन व्हा.
२. त्यानंतर settings वर क्लिक करा.
३. settings मध्ये Lab या पर्यायावर जा.
४. Add any gadget by its URL "enable" करा. आणि मग "save changes" वर क्लिक करा.
५. आता परत settings वर क्लिक करा. यावेळी settings मध्ये तुम्हाला gadgets हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक करा.
६. Add a gadget by its URL च्या खाली, दिलेल्या रिकाम्या जागेत, आत्ता देत असलेली लिंक कॉपी आणि पेस्ट करुन टाका.
७. फेसबुकसाठी त्या रिकाम्या जागेत पुढे देत असलेली लिंक टाका आणि Add वर क्लिक करा  http://hosting.gmodules.com/ig/gadgets/file/104971404861070329537/facebook.xml
८. ट्विटरसाठी त्या रिकाम्या जागेत पुढे देत असलेली लिंक टाका आणि Add वर क्लिक करा  http://twittergadget.appspot.com/gadget-gmail.xml
 ९. आता inbox वर क्लिक करा आणि आपल्या डाव्या साईडबारमध्ये खालच्या बाजूला (चॅटच्या खाली) पहा! फेसबुक आणि ट्विटर, तुमच्या जीमेलला जोडले गेल्याचे तुम्हाला दिसून येईल. गुगलने गुगल बझ जीमेलला जोडलं! अगदी तसंच फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडले जातील.
१०. फेसबुकचे स्टेटस पाहण्यासाठी ‘फेसबुक वेजेट’च्या expand या पर्यायावर क्लिक करा. ट्विटरचे स्टेटस पाहण्यासाठी ‘click here' लिहिले आहे, त्यातील here या लिंक वर क्लिक करा.
११. युजरनेम, पासवर्ड टाकून परवानगी (Allow) दिल्यानंतर तुमचे अकाऊंट्स जीमेलमध्ये काम करु लागतील.

अशाप्रकारे गुगल बझ नंतर फेसबुक आणि ट्विटरचे अकाऊंट्स देखील तुम्हाला तुमच्या जीमेल खात्याशी जोडता येतील. हे दोन अकाऊंट्स जीमेलशी जोडले गेल्याने आपली अतिशय उत्तम अशी सोय होणार आहे.

वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

ऑर्कुटवर मोफत जाहिरात करा

क दोन वर्षांपूर्वी आर्कुटवर जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या, पण त्यानंतर वरच्या कोपर्‍यात उजव्या बाजूला ऑर्कुटद्वारे गुगलच्या जाहिराती दाखवल्या जाऊ लागल्या. या जाहिरातींमुळे मित्रांची यादी थोडीशी खाली गेली. असो! त्यानंतर मात्र ऑर्कुटने आपल्यालाही त्या तिथे मोफत जाहिरात करण्याची संधी दिली. जिचा आपण फारच चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेऊ शकतो.

ऑर्कुटच्या मराठी भाषांतरात ‘promote’ च्या ठिकाणी ‘जाहिरात करा’ हा शब्द वापरला आहे. म्हणून मी ‘ऑर्कुटच्या जाहिराती’ असा या इथे उल्लेख करत आहे. बाकी ऑर्कुटच्या जुन्या आवृत्तीत ‘प्रोस्ताहित करा’ असा ही शब्दप्रयोग वापरल्याचं दिसून येतं.

ठिक आहे! तर इंटरनेटवरील एखादे पान ऑर्कुटवर ‘प्रमोट’ कसे करायचे!? ते आपण मागील एका लेखाद्वारे पाहिले आहे. त्यात Share on orkut या बटणाबाबत माहिती देण्यात आली होती. ‘शेअर ऑन ऑर्कुट’ या बटणाचा वापर केल्याने आपण इंटरनेटवरील कोणत्याही पानाची जाहिरात क्षणार्धात तयार करु शकतो. त्यासाठी ‘शेअर ऑन ऑर्कुट’ हे बटण आपल्या वेब ब्राऊजर वर घ्या. आणि त्यानंतर आपल्या वेब ब्राऊजरमध्ये इंटरनेटवरील ‘ते’ पान उघडा, ‘ज्या’ पानाची जाहिरात आपल्याला ऑर्कुटवर करायची आहे. जसं समजा मी 2know.in हे पान उघडलं आहे. आता मी माझ्या वेब ब्राऊजरच्या वरच्या बुकमार्क बारमधील ‘Share on orkut’ या बटणावर क्लिक करणार! त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यात promote to your friends हाही एक पर्याय असेल. त्याला अधीपासूनच टिक मार्क केलेलं असेल, त्याला तसंच राहू द्या. आणि आता Share वर क्लिक करा! झाली तुमची जाहिरात तयार!

जाहिरात तयार करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे...
१. सर्वात आधी orkut.com वर जा. (मी ‘मराठी भाषेतील ऑर्कुट गृहित धरुन पुढील माहिती सांगत आहे.)
२. प्रोफाईल, स्क्रॅप, फोटो, व्हिडिओ या रांगेत शेवटी ‘अधिक’ हा पर्याय दिलेला आहे, त्यावर जा.
३. ‘अधिक’ या पर्यायावर आपल्या माऊसचा कर्सर नेल्यानंतर येणार्‍या पर्यायांच्या रांगेत ‘जाहिरात करा’ हा एक पर्याय आपल्याला दिसून येईल. (इंग्लिश ऑर्कुट वापरणार्‍यांना more मध्ये promote हा पर्याय दिसून येईल.) त्यावर क्लिक करा.
४. आता जाहिरात तयार करत असताना आपल्या जाहिरातीला योग्य असे एक ‘शीर्षक’ द्या. ‘टिप्पणी’ या पर्यायाद्वारे आपल्या जाहिरातीबाबत थोडक्यात माहिती सांगा. शेवटच्या ‘सामग्री’ या पर्यायाद्वारे तुम्ही एखादा फोटो (प्रतिमा) किंवा यु ट्युब व्हिडिओ आपल्या जाहिरातीला जोडू शकता.
५. योग्य अशी जाहिरात तयार केल्यानंतर सर्वात शेवटी ‘जाहिरात तयार करा’ या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमची जाहिरात ऑर्कुटवर प्रसारीत झालेली असेल.

तुम्ही अशा कितीही जाहिराती तयार करु शकता. आणि त्याच पानावर दिलेल्या ‘माझ्या जाहिराती’ या पर्यायाद्वारे तुम्ही त्या जाहिराती सांभाळू शकता! म्हणजेच त्यांत बदल करु शकता किंवा त्यांना हटवू शकता, डिलीट करु शकता.

याशिवाय ‘माझ्या जाहिराती’ या पर्यायाद्वारे तुम्ही, ‘तुमची जाहिरात किती वेळा पाहिली गेली?’, ‘किती वेळा त्या जाहिरातीतील लिंकवर क्लिक केले गेले?’, ‘किती जणांनी तुमच्या जाहिरातीची जाहिरात केली?’ म्हणजेच ती प्रमोट केली! तर ‘किती जणांनी ती डिलीट करुन टाकली?’ म्हणजेच किती जणांनी तिला कचर्‍याची पेटी दाखवली!?, हे सारं काही तुम्ही जाणून घेऊ शकता! त्यासाठी ‘जहिरात करा’ या पानावरील ‘माझ्या जाहिराती’ या पर्यायावर जा.

तुमची जाहिरात प्रथम तुमच्या ऑर्कुटमधील मित्रांच्या मुख्य पानावर ‘गुगलच्या जाहिराती’ दाखवल्या जातात त्या तिथे अधुनमधून दाखवली जाईल! जर तुम्ही केलेली जाहिरात तुमच्या मित्राला आवडली, तर तो ती जाहिरात त्या तिथेच दिलेल्या पर्यायाद्वारे ‘प्रमोट’ करेल! म्हणजेच तिचा ‘प्रचार’ करेल! आणि जर त्याला ती जाहिरात आवडली नाही, तर तो तिला कचर्‍यात टाकेल, डिलीट करेल! समजा जर तुमच्या मित्राने तुमच्या जाहिरातीचा प्रचार केला, तर तुमच्या मित्राच्या ऑर्कुट फ्रेंड सर्कल मध्ये ती जाहिरात सर्वत्र दाखवली जाईल. अशाप्रकारे तुमच्या जाहिरातीचा ऑर्कुटवर प्रचार होत जाईल. ती जाहिरात ऑर्कुटवर पसरत जाईल!

खाली दिलेला व्हिडिओ देखील तुम्हाला कदाचीत या कामात मदत करु शकेल.


चांगल्या सामाजिक कारणांसाठी देखील आपण ‘ऑर्कुट प्रमोट’ चा उपयोग करु शकतो. खरं तर त्याच कारणासाठी ‘ऑर्कुट प्रमोट’ चा अधिक उपयोग होऊ शकतो!

वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

इंटरनेट वरील कोणतेही पान ऑर्कुट वर शेअर करा

मागे एकदा क्रोम वेब ब्राऊजर वापरत असताना, इंटरनेटवरचे आवडलेले पान ऑर्कुटवर शेअर करण्यासाठीचे बटण मी वापरले होते. अगदी उपयुक्त असं हे बटण आहे! म्हणजे कसं? तर याचा युज केल्याने इंटरनेटवरील आवडलेल्या पानाबद्दलची माहिती, आपण आपल्या ऑर्कुट प्रोफाईल अपडेट्सद्वारे सर्व मित्रांपर्यंत लगेच पोहचवू शकतो.

ऑर्कुटमध्ये ‘प्रमोट’ नावाची नवीन गोष्ट मागील काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. ‘वाघ वाचवा!’ अशा मथळ्याखाली काही जणांनी केलेलं प्रमोशन आज मला ऑर्कुटवर दिसून आलं आणि मला त्या क्रोमवरील बटणाची पुन्हा एकदा आठवण झाली! कारण त्या बटणाचा उपयोग केल्याने एकतर ‘प्रमोट’ जाहिरात आपोआप तयार होत होती आणि आपल्या ऑर्कुट अपडेट्सद्वारेही आपण देत असलेली माहिती मित्रांपर्यंत पोहचू शकत होती.

म्हणून मग शेवटी गुगल सर्च इंजन मधून त्या बटणाचा शोध घेतला! आधी मला वाटत होतं की, ते बटण सहजासहजी मिळणार नाही ...पण खरं तर मला ते लगेच सापडलं. मी सध्या फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरत असल्याने मला माझ्या फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी ते बटण हवं होतं.

या इथे तुम्हाला तुमच्या ‘कोणत्याही’ वेब ब्राऊजर साठी ‘share on orkut’ हे बटण मिळेल. फायरफॉक्स वाल्यांनी आपल्या माऊसचे लेफ्ट क्लिक दाबून धरत त्या तिथे दिलेले बटण उचलायचे आणि वेब ब्राऊजरच्या वरच्या बुकमार्क बार मध्ये सोडून द्यायचे! की झालं!

खाली मी काही स्क्रिनशॉट्स देत आहे... फायरफॉक्स, क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी असे वेगवेगळे वेब ब्राऊजर्स वापरणार्‍यांनी ते बटण आपल्या वेब ब्राऊजरवर कसे घ्यावे!? हे त्यातून सांगितले आहे. वर दिलेल्या लिंकद्वारेही तुम्ही ही माहिती मिळवू शकता! खाली देत असलेले स्क्रिनशॉट्स मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करा, ते नवीन टॅबमध्ये ओपन होतील. खाली चित्रात दाखवलेले बटण मिळविण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
इंटरनेट एक्सप्लोरर
मोझिला फायरफॉक्स
सफारी
गुगल क्रोम
आता एकदा हे बटण आपण आपल्या वेब ब्राऊजर वर घेतलं आहेच, ...तर मग 2know.in चं हेच पान share on orkut करुन ...म्हणजेच ऑर्कुटवर शेअर करुन तुमच्या बटणाची चांगली सुरुवात करा! share on orkut हे बटण कसं काम करतं!? ते पहा!
 

मोफत डोमेन नेम

Free Domain names for blogeers !

मराठीत खुप चांगले ब्लॉग लिहिले जात आहेत. ब्लॉग आता खाजगी पुरता मर्यादीत राहीलेला नसुन तो जास्तीत जास्त जणांनी वाचावा अशीच ब्लॉगधारकाची इच्छा असते. आपला ब्लॉग ही आपली इंटरनेटवरची ओळख बनावी म्हणुन बरेच जण प्रयत्नशील असतात.http://www.co.cc/ -

तसे blogger.com आणि wordpress.com सारख्या साईट्स या दॄष्टीने बर्‍याच सुवीधा पुरवीतात. पण ब्लॉगच्या मुख्य ओळखीमध्ये म्हणजे नावातच आपला वाटा देखील सांगतात. आता www.myname.blogspot.com अथवा www.myname.wordpress.com पेक्षा www.myname.com असे नाव सांगणे कोणालाही आवडेल. ते वाचकांना लक्षात ठेवणे देखील सोपे जाते.
परंतु आपण सगळेच जाणतो की .com हे एक्स्टेंशन मोफत मिळत नाही तर ते वीकत घ्यावे लागते.
माझ्या ज्या मित्रांना पैसे देउन साईटचे नाव विकत घेण्याची इच्छा नाही आहे त्यांच्या साठी मी हे दोन सर्वोत्तम उपाय सुचवीत आहे. मला आशा आहे की सर्व ब्लॉगर्सना ते नक्कीच आवडतील.
१.
ही साईट एक अफलातुन साईट असुन .co.cc असे एक्स्टेंशन असलेले साईटचे नाव (Domain Name) चक्क मोफत देते. म्हणजे इथे एकदा रजिस्ट्रेशन केलेत की तुम्ही तुमच्या ब्लॉगला एक स्वतंत्र नाव देउ शकता. उदाहरणार्थ – http://www.netbhet.blogspot.com/ चे www.netbhet.co.cc किंवा www.netbhet.cc.cc असे नामकरण करता येइल आणि ते देखील पुर्णपणे चकटफू!


ही देखील के मोफत डोमेन नेम पुरवीणारी वेब साईट आहे. अगदी साधे आणि सोपे .tk असे एक्स्टेंशन ही वेबसाईट पुरवीते. इथे एकदा रजिस्ट्रेशन केले की ९० दिवसांपर्यंत आपण घेतलेले डोमेन नेम काही वेळा वापरणे महत्त्वाचे असते ( बहुदा ७५ वेळा) नाहीतर आपल्या साईटचे नाव काढुन घेतले जाते.
उदाहरणार्थ – http://www.netbhet.blogspot.com/ चे www.netbhet.tk असे नामकरण करता येइल आणि ते देखील मोफत!
एवढेच नव्हे तर ही वेब साईट आपला इमेल आयडीचे देखील नामकरण करुन देते. म्हणजेच myname123@rediffmail.com अशा इमेल आयडीला myname@mysurname.tk असे नाव देता येइल.
मग ब्लॉगर्स व्हा पुढे आणि आताच आपले आवडते नाव सुरक्षीत करुन घ्या नाहीतर पुन्हा .com एक्स्टेंशन सारखा मनाजोगत्या नावांचा दुष्काळ इथेही चालु होइल.

इमेजचा आकार, मेमरी कमी करा

मस्कार मित्रांनो! तुम्ही कसे आहात!? एक नवीन महिना सुरु झाला आहे. माझ्या दृष्टीने हा महिना थोडासा बोऽअर आहे. पण या महिन्याचे १८ लेख पूर्ण करण्याचा माझा पुरेपुर प्रयत्न राहिल. कदाचीत या महिन्याच्या अखेरपर्यंत आपण 2know.in च्या लेखांचे शतक पूर्ण करु!

एखाद्या इमेजचा आकार कमी कसा करता येईल!? ते आज आपण पाहणार आहोत. पर्वा माझ्या दुसर्‍या एका ब्लॉगवर लिहित असताना मला एक समस्या जाणवली, ती म्हणजे माझ्या ब्लॉगशेजारी मी जे फोटो अपलोड केले होते, त्यांची मेमरी खूप जास्त होती आणि मग पेज लोड व्हायला देखील खूप वेळ लागत होता. म्हणून त्या फोटोची, इमेजची मेमरी कमी करुन मी तो पुन्हा माझ्या ब्लॉगवर अपलोड करण्याचा निर्णय घेतला.
खरं तर या कामात एखाद्या ऑनलाइन सेवेची मदत घ्यावी असा विचार मी करत होतो, पण नंतर वाटलं तो फोटो ऑनलाईन अपलोड करा, मग रिसाईझ करा आणि मग परत डाऊनलोड करुन ब्लॉगवर अपलोड करा... इतकं करत बसण्यापेक्षा संगणकावरुनच आपली इमेज रिसाईझ करावी. त्यासाठी मी काय केलं!?

१. माझी इमेज संगणकावरील ज्या फोल्डरवर होती, तो फोल्डर ओपन केला.
२. जी इमेज रिसाईझ करायची आहे, त्यावर राईट क्लिक केलं.
३. Open With - Microsoft Photo Editor.
४. तुमच्याकडे जर Microsoft Photo Editor नसेल, तर ते तुम्हाला या इथे मोफत मिळेल.
५. Microsoft Photo Editor मधून माझी इमेज ओपन केल्यानंतर Image या पर्यायावर मी माझ्या माऊसचा कर्सर नेला आणि Resize... वर क्लिक केले.
६. % चे दोन बॉक्स आहेत. त्या दोन्ही ठिकाणी मी ५०% केलं (तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कितीही कमी करु शकता). आणि मग OK वर क्लिक केलं.
७. अशाप्रकारे माझ्या इमेजचा आकार आता निम्याने कमी झाला आहे.
८. आणि जसा आकार कमी झाली आहे, तशीच त्याची मेमरी देखील कमी झाली आहे.


मायक्रोसॉफ्ट फोटो एडिटर
तर Microsoft Photo Editor चा उपयोग करुन तुम्ही कोणत्याही इमेजचा आकार क्षणात बदलू शकता! त्या इमेजची मेमरी कमी करु शकता

वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

फोटो चे कार्टून तयार करा

ज आपण काहीतरी मजेशीर करुयात. म्हणजे आपल्याकडील एखाद्या फोटोचे कार्टून तयार करुयात. थोडासा विरंगुळा म्हणून ही आयडीया चांगली आहे. चला मग! लगेचच कामाला सुरुवात करुयात. त्यासाठी आपल्याला kusocartoon.com या वेबसाईटवर जावं लागेल.

१. वर दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर Convert Your Photo To Cartoon Now ! असं लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. त्याखाली सहा प्रकारचे कार्टून इफेक्टस्‌ दिलेले आपल्याला दिसून येतील. आपल्या माऊसच्या सहाय्याने त्यापैकी एकाची निवड करा.
<> 
कार्टून चा प्रकार, इफेक्ट निवडा
फोटो अपलोड करा
२. त्यानंतर पानाच्या खाली Browse... या बटणावर क्लिक करुन, आपला स्वतःचा किंवा आपल्या एखाद्या मित्राचा फोटो संगणकावरुन निवडा. वर Tags मध्ये फोटो बाबत दोन शब्दात काहीतरी लिहा. आणि मग Upload Photo वर क्लिक करा.
३. यानंतर नवीन पानावर आपण जाल, जिथे Upload Success असं लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. त्याखाली लिहिलं असेल, photo editing... wait -- seconds.
४. काही सेकंदांनंतर हिरव्या रंगात Done. Click Here To View अशी ओळ येईल. त्यावर क्लिक करा.
५. आणि मग... तुम्हाला तुमचा कार्टूनाईझ झालेला फोटो दिसून येईल!
६. त्याखाली Cartoon Converter नावाचा बॉक्स दिसेल. त्याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या कार्टुनला अधिक चांगला आकार, इफेक्ट देऊ शकाल. आता या माध्यमातून देता येतील अशा इफेक्टसची यादी वाचत बसण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच त्यांना आजमावून पाहू शकता.
कार्टून कन्व्हर्टर इफेक्टस्‌
अशाप्रकारे आपला आजचा विरंगुळा संपला आहे... आता आधिसारख्याच मख्ख चेहर्‍याने संगणकाला डोळे चिटकवलेत तरी चालेल!
 
वरील लेख www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.

Read more: फोटो चे कार्टून तयार करा | इंटरनेट, 2know.in http://www.2know.in/2010/05/blog-post_02.html#ixzz1d3D1C1pU
Under Creative Commons License: Attribution Non-Commercial No Derivatives

नको असलेले ईमेल फिल्टर करा

जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांपासून दूर राहणं हे कधीकधी आवश्यक बनून जातं. अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींपासून ते इरिटेट करणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत! आत नको असलेले ईमेलच पहा ना! काय करायचं या ईमेल्सचं!? स्पॅम घोषीत करुन टाकायचं!? पण का!? मला मुळात ते माझ्या इन्बॉक्स मध्येच नको आहेत! अशावेळी मला काय करता येईल? त्यासाठीही एक पर्याय आहे ना! मेल फिल्टर करण्याचा! मेल फिल्टर करण्याची सुविधा मला वाटतं सर्वच ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या देतात. पण आजकाल जीमेल वापरणार्‍यांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि मी स्वतः जीमेल वापरत असल्याने आपण जीमेलच्या माध्यमातून नको असलेले ईमेल्स कसे फिल्टर करता येतील!? ते पाहणार आहोत.

१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जीमेल.कॉम वर जावं लागेल.
२. त्यानंतर वेळ येते ती नको असलेला मेल एकदा शेवटचा उघडण्याची! एख्याद्या व्यक्तिचा, संस्थेचा वारंवार येणारा, नको असलेला कोणताही एक मेल उघडा.
(मी खरं तर मी मराठी जीमेल वापरतो, पण आपल्यापैकी बहुतेक जण इंग्रजी जीमेल वापरत असल्याने काही काळासाठी मी माझ्या जीमेलची भाषा इंग्रजी करत आहे.)
३. तर आपण नको असलेला एक मेल उघडला आहे. मेलच्या वरच्या बाजूला More actions मधून Filter messages like these या पर्यायावर क्लिक करा.
More actions मधून Filter messages like these या पर्यायावर क्लिक करा
४. यानंतर नको असलेला ईमेल फिल्टर करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
५. Next Step वर क्लिक करा.
Next Step वर क्लिक करा
६. Delete it या पर्यायावर टिक मार्क करा.
Delete it पर्यायावर टिक मार्क करुन Create Filter वर क्लिक करा
७. Create Filter वर क्लिक करा.
८. तुमचा फिल्टर तयार झालेला असेल. भविष्यात जर तुम्हाला हा फिल्टर काढून टाकावासा वाटला अथवा एडीट करावासा वाटला, तर तसं तुम्ही जीमेलच्या settings या पर्यायाद्वारे करु शकता. तिथे Filters नावाचा उपपर्याय तुम्हाला दिसून येईल. त्याचा याकामात उपयोग करा.
Settings मधून Filters एडीट करा
आता इरिटेट करणार्‍या, नको असलेल्या अशा व्यक्तिचा, संस्थेचा, संघटनेचा वारंवार येणार ईमेल परस्पर डिलिट होत राहिल. आणि त्यासाठी व्यक्तिशः तुम्हाला काहीएक करण्याची गरज उरणार नाही.

वरील लेख लेखक रोहन जगताप यांच्या www.2know.in या साईट वरून घेण्यात आला आहे.